E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ government employee loan agrime shasan nirnay ] : शासकीय कर्मचारी इत्यादींना कर्ज , वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे , वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमे , या लेखाशिर्षांखाली सन 2024-25 या वर्षाकरीता मंजूर अनुदानातुन विवरणपत्र ब मध्ये दर्शविलेल्या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिम मंजूर करण्याच्या प्रयोजनासाठी निधी वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहेत .
सदर शासन निर्णयानुसार अधिकारी / कर्मचारी यांस पात्र ठरवुन वितरीत करण्याची दक्षता नियंत्रण्क अधिकाऱ्यांनी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . यानुसार अधिकाऱ्यांचा / कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीचा दिनांक लक्षात घेवून अधिकारी / कर्मचारी यांचे अग्रिम मंजूरीचे आदेश काढण्यात यावेत , असे नमुद करण्यात आलेले आहेत .
तसेच सदर अग्रिमे अर्जदाराने त्याच कारणांसाठी वापल्याचा प्रमाणपत्राची एक प्रत संबंधित कार्यालयाने संबंधित कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करुन घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . तसेच अधिकारी / कर्मचारी खरेदी करणार असलेल्या संगणकाची किंमत प्रमाणित अग्रिमापेक्षा कमी असल्यास , संगणकाच्या किंमती इतकेच अग्रिम अर्जदारास मंजूर करण्यात यावेत असे नमुद करण्यात आलेले आहेत .
हे पण वाचा : जुन्या पेन्शनच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण निर्णय ;
तसेच जर काही कारणास्तव सदर अग्रिम मंजूर करण्यात येत नसेल अथवा नाकारण्यात येत असेल , तरीही शासनांस त्वरीत कळविण्यात यावेत , अन्यथा याबाबतची संपुर्ण जबाबदारी संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांवर राहील याची नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
अधिकारी / कर्मचारी यांना मंजूर करण्यात आलेल्या वैयक्तिक संगणक खरेदी अग्रिमांबाबत त्यांच्या सेवापुस्तकांमध्ये नोंद घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . या संदर्भातील विधी व न्याय विभागांकडून दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.