केंद्र सरकारचा कर्मचाऱ्यांना मोठा झटका ; या मागण्यां पुर्ण होणार नसल्याचे स्पष्टीकरण ..

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ government employee demand news ] : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहेत . सरकारी कर्मचाऱ्यांकडुन मागील कोरोना कालावधीमधील महागाई भत्ता फरक देण्यात यावा अशी मागणी करण्यात येत होती , यावर केंद्र सरकारने स्पष्टीकरणे दिले आहेत .

संसदेमध्ये एका सदस्याने कोरोना कालावधीमधील 18 महिने थकीत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता थकबाकी देणेबाबत प्रश्न उपस्थित केला होता , यावेळी केंद्रीय वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले कि , सदर कालावधीमधील पैसा हा इतर कारणांसाठी खर्ची टाकण्यात आला आहे , सदर वित्तलब्धी अत्यावश्यक बाबींकरीता खर्च करण्यात आलेली होती .

यामुळे सदर कालावधीमध्ये महागाई भत्ता अदा करता येणार नसल्याचे व भविष्यात देखिल अदा करणेबाबत केंद्र सरकारचा विचार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहेत .यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक प्रकारचा धक्काच बसला आहे .

त्याचबरोबर नविन वेतन आयोग बाबत केंद्र सरकारचा सध्य स्थितीमध्ये कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आल्याने , सरकारी कर्मचाऱ्यांना एक प्रकारचा मोठा झटकाच बसला आहे .

सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2026 मध्ये नविन वेतन आयोग लागु होणे अपेक्षित आहे , याबाबत समितीचे गठण निदान 1 वर्षापुर्वी होणे आवश्यक आहे , यामुळे याबाबतचा निर्णय पुढील वर्षापर्यंत घेतल्यास , सरकारी कर्मचाऱ्यांना नियोजित कालावधीमध्ये नविन वेतन आयोग लागु केला जाईल , अन्यथा नविन वेतन आयोगासाठी आणखीण वाट पाहावी लागेल .

Leave a Comment