राज्यातील या 14 जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीनिमित्त आनंदाचा शिधा !

Spread the love

E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ ganesh festival anandacha shidha ] : गणेश चतुर्थीनिमित्त राज्यातील खाली नमुद करण्यात आलेल्या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाचा शिधा 100/- रुपयांमध्ये दिला जाणार आहे . यांमध्ये 04 वस्तु मिळणार आहेत .

राज्यात सध्या गणेशोत्सव काळात राज्यात मोठ्या आनंदाचे वातावरण असते , यामुळे नागरिकांना गोडधोड करण्यासाठी फक्त 100/- रुपयांमध्ये चार वस्तु मिळणार आहेत , यांमध्ये चणादाळ 1 किलो , साखर 1 किलो , रवा 1 किलो , सोयाबीन तेल 1 किलो या 04 वस्तुंचा समावेश आहे .या चार वस्तु फक्त 100/- रुपयांच्या किंमतीमध्ये मिळणार आहेत .

प्रत्येक सणासुदीच्या काळांमध्ये राज्य शासनांकडून आनंदाचा शिधा दिला जातो , यामुळे सदर सणाच्या काळांमध्ये गरीब नागरिकांचा सण उत्साहामध्ये साजरा होतो , कारण सदर सण काळांमध्ये आवश्यक असणारे खाद्य पदार्थ सदर आनंदाचा शिधा मध्ये केवळ 100/- रुपयांमध्ये दिला जातो .

💁💁हे पण वाचा : शासकिय योजना, भरती, हवामान अंदाज, इ. अपडेट साठी विभाग निहाय WhatsApp ग्रूप मध्ये जॉईन व्हा !

फक्त या जिल्ह्यातीलच शेतकरी कुटुंबाना मिळणार लाभ : सदर आनंदाचा शिधा हा राज्यातील मराठवाडा व  अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांना तसेच नागपुर या विभागातील वर्धा असे एकुण 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सदर आनंदाचा शिधा मिळणार आहे . तर ज्यांच्याकडे केशरी शिधापत्रिका / तसेच दारिद्र रेषेखालील शेतकऱ्यांना सदर आनंदाचा शिधा दिला जाणार आहे .

Leave a Comment