E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ farmer moter pumb free electricity ] : राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनांकडुन मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे . सदर निर्णयांनुसार राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीपंपाकरीता मोफत वीजपुरवठा प्राप्त होणार आहे .
शेतामधील उत्पनाचे प्रमाण वाढावेत , याकरीता राज्य शासनांकडून मागेल त्याला सौर उर्जा पंप , मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना – 2024 तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या योजनांची सरुवात करण्यात आलेली आहे . यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठे लाभदायक ठरत आहेत .
मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना : सदर योजनांच्या माध्यमातुन वीजबिलाचा भार उचलण्याचे राज्य शासनांकडून निर्ण घेण्यात आला आहे , या अंतर्गत राज्यातील तब्बल 145 लाख शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमता पर्यंतच्या शेती पंपांना पुर्णपणे मोफत वीज पुरवठा करण्यात येणार आहेत .सदरची योजना ही पुढील 5 वर्षांकरीता राबबवण्यात येणार असून , एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबविण्यात येणार आहे .
सदर योजना अंतर्गत 7.5 अश्वशक्ती पर्यंत शेतीपंपाचा वापर करणारे राज्यातील सर्व शेतकरी सदर योजनांच्या माध्यमातुन लाभ घेवू शकतील . सध्य स्थितीमध्ये राज्यात 47.41 लाख इतके कृषी पंप ग्राहक आहेत , सदर ग्राहकांना महावितरण कंपनीकडून वीजेचा पुरवठा करण्यात येतो , यापैकी 16 टक्के ग्राहक हे कृषीपंप ग्राहक असुन , त्यापेकी 30 टक्के उर्जेचा वापर कृषी क्षेत्राकरीता करण्यात येतो .
हे पण वाचा : भारतीय रेल्वे विभाग मध्ये 4096 जागेसाठी आत्ताची मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !
राज्य शासनांच्या विद्युत कायदा 2003 च्या कलम 65 नुसार वीज ग्राहकांना अनुदान देवून त्यानुसार अनुदानित वीज दर लागु करण्याचे अधिकार प्रदान आहेत , वीज बिल माफ केल्याच्या नंतर वीजदर सवलती पोटी रक्कम राज्य शासनांकडून वर्ग करण्यात येत असते .राज्य शासनांच्या सदर योजनांकरीता वीजदर सवलत 6985 कोटी अधिक वीज बिल माफ नुसार 7,775/- कोटी असे वार्षिक वीजदर सवलती करीता प्रति वर्ष 14,760/- कोटी शासनांकडून शेतकऱ्यांकरीता खर्च करण्यात येणार आहेत .