खोट्या प्रमाणपत्र धारक कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करणे बाबत सर्व जिल्हाधिकारी यांच्या प्रति परिपत्रक सादर .

Spread the love

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ employee Re-checking shasan paripatrak ] : राज्यातील कर्मचाऱ्यांची तपासणी करून नोकरीमध्ये दिव्यांग प्रवर्गातून खोट्या प्रमाणपत्र धारण करून सेवेत सामील झालेल्या उमेदवारांची फेर मेडिकल तपासणी करून खोट्या प्रमाणपत्र आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण आयुक्तालय मार्फत दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर परिपत्रकानुसार राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन बरेच उमेदवार सरकारी निमसरकारी सेवेमध्ये दाखल झालेली आहे . सदर दिव्यांगत्वाचे खोटे प्रमाणपत्रामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत असल्याने , याकरिता दिनांक 19 जुलै 2024 ते दिनांक 3 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये खोट्या दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबवण्यात आले होते  .

सदरच्या अभियानातून सरकारी , निमसरकारी सेवेत विविध विभागामध्ये नियुक्ती मिळवलेल्या खोट्या प्रमाणपत्र धारक एकूण 359 उमेदवारांची नावे समोर आली आहेत . सदर संशयित उमेदवारांची दिव्यांगत्वाची तपासणी करून , त्यामधील सत्यता पडताळणी करणे आवश्यक आहे . सदर यादीमधील दिव्यांगत्व व प्रमाणपत्र पुन्हा तपासणी करून त्यांची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . व बोगस दिव्यांग सापडल्यास त्यांच्यावर कार्यवाही करून सेवेतून बडतर्फ करण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे  . व त्यांच्या जागेवर प्रत्यक्षा यादीतील दिव्यांग उमेदवार यांची नियुक्ती करण्याची निर्देश देण्यात आलेले आहेत.

विविध खात्यामध्ये नियुक्ती मिळालेल्या बोगस प्रमाणपत्र धारक 359 दिव्यांग कर्मचारी यांची संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय दिनांक 14 सप्टेंबर 2018 मधील मुद्दा क्रमांक ग मध्ये अपील निर्देशित मंडळ यांच्याकडे फेर तपासणी करता येईल असे कळविण्यात आले आहेत .

हे पण वाचा : जुनी पेन्शन योजना व सुधारित युनिफाइट पेन्शन योजनांमध्ये नेमका कोणता फरक आहे ? जाणून घ्या सविस्तर .

सदर परिपत्रकानुसार राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांना आपल्या जिल्ह्यातील कार्यरत दिव्यांग उमेदवारांची दिव्यांगत्वाची फेर तपासणी नियुक्ती प्राधिकारी यांच्यामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागाचा शासन निर्णय दिनांक 14 सप्टेंबर 2018 मधील मुद्दा क्रमांक ग मध्ये नमूद संबंधित अपील निर्देशी मंडळ यांच्याकडे करून घेण्याबाबत , आपल्या स्तरावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश सदर शासन पत्रिक परिपत्रकानुसार देण्यात आलेली आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment