E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ employee demand letter send to cm ] : राज्यातील अधिकारी , कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्याबाबत तसेच कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या मागण्या पूर्ण करणेबाबत , राजू देवनाथ पारवे आमदार उमरेड विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र सादर करण्यात आले आहेत .
सदर पत्रानुसार राज्यातील नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्याबाबत तसेच खालील नमूद मागण्या पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्री यांना पत्र सादर करण्यात आले आहेत . सदर पत्रानुसार राज्यातील नगरपरिषद अधिकारी , कर्मचाऱ्यांकडून दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासून राज्यव्यापी बेमुदत आंदोलन सुरू आहे . सदर अधिकारी , कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती सदर पत्रानुसार करण्यात आली आहे .
राज्यातील अधिकारी , कर्मचारी यांच्या समस्या व मागण्या : यामध्ये जुनी पेन्शन योजना ( OPS ) अथवा नवीन राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंमलबजावणी लवकरात लवकर लागू करणे , राज्य संवर्ग पदे 7 वा वेतन आयोग अधिसूचनेत पदांचा समावेश करून सेवार्थ नंबर मिळणे , सहायक अनुदान एक महिना आगाऊ मिळणे , सातवा वेतन आयोग फरक त्याचबरोबर मागिल महगाई भत्ता फरक तात्काळ मिळणे .
त्याचबरोबर नगरपरिषद कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्याप्रमाणे आश्वासित प्रगती योजना 10 , 20 , 30 वर्षे लागू करणे , राज्य संवर्ग सर्वसाधारण बदल्यांमधील जाचक अटी वगळण्यात यावे , पदोन्नती कोट्यातील रिक्त पदे भरणे , मुख्याधिकारी विभागीय स्पर्धा परीक्षा एमपीएससी मार्फत घेण्यात यावी , सेवानिवृत्ती उपदान व रजा रोखीकरण शासनाकडे भरणे स्थानिक कर्मचारी निवृत्ती रकमांचे अनुदान मिळणे धारणाधिकार सहा नियुक्ती व बदली पद स्थापना करणे .
त्याचबरोबर वेतन शासन लेखा कोषागार मार्फत करण्यात यावे संवर्ग सेवेतील श्रेणी अ पदास गट ब राजपत्रित दर्जा व श्रेनी ब पदास गट ब व अराजपत्रित दर्जा मिळणे अशा प्रमुख मागण्या राज्यातील नगरपरिषद अधिकारी कर्मचाऱ्यांच्या असून , सदर मागण्या पूर्ण करण्याची विनंती माजी आमदार राजू पारवे यांच्याकडून करण्यात आले आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..