खुशखबर : कापूस , सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अखेर निर्गमित झाला लाभदायक शासन निर्णय ; GR दि.03.09.2024

Spread the love

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ cotton & soyabean producer farmer GR ] : सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुरवणी मागणी द्वारे उपलब्ध झालेला 4194.68 कुटी रुपये इतका निधी पैकी 2516.80 कोटी रुपये 2024-25 मध्ये वितरित करण्याबाबत , राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस , सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्राकरिता सरसकट 1,000/- रुपये तर 0.2  हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राकरिता त्यांच्या क्षेत्रानुसार , प्रति हेक्टर पाच हजार रुपये ( कमाल  2 हेक्टर मर्यादेत) अर्थसाह्य देण्यात यावे , असे नमूद करण्यात आले आहे .

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य देण्याकरिता जुलै 2024 मध्ये सन 2024 – 25 करिता 4194.68 कोटी रुपये इतका निधी पुरवणी मागणी द्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे . वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या 60 टक्के च्या मर्यादित रुपये 2516.80 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे . त्या अनुसरून 2516.80 कोटी रुपये निधी वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .

हे पण वाचा : पोलिस दलांमध्ये किचन सेवा ( स्वयंपाक ) अंतर्गत दहावी पात्रता धारकांसाठी 819 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

सदर शासन निर्णय नुसार सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता 2516.80 कोटी रुपये निधी शासन निर्णयानुसार आयुक्त पुणे यांना अर्थसंकल्पिय वितरण प्रणाली द्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे .

यामध्ये पीक संवर्धन , कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना तसेच अर्थसहाय्य या लेखाशीच्या खाली सदर निधी खर्च करण्याचे निर्देश आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे यांना देण्यात आली आहे .

या निर्णयामुळे राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत निधी म्हणून लवकरच बँक खात्यात कमाल 10,000/- रुपये वर्ग केले जाणार आहेत .

शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर  अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.

Leave a Comment