राज्यातील सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000/- अनुदान आजपासुन मिळणार !

Spread the love

E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ cotton & soyabean anudan ] : राज्यातील सोयाबीन व कापुस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000/- रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनांकडून घेण्यात आला आहे , तर सदरचे अनुदान आज पासुन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात येणार आहेत .

आज दिनांक 21 ऑगस्ट पासुन बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या ठिकाणी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आलेले आहेत . सदर कृषी प्रदर्शनांस केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान , राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत . सदर प्रदर्शनांचे प्रमुख मान्यवर केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते सदर पोर्टलचे उद्घाटन करण्यात येणार आहेत .

याकरीता शेतकऱ्यांचे आधार संलग्न असणाऱ्या बँक खात्यांमध्ये पैसे वर्ग करण्यात येणार आहेत . सध्यस्थितीमध्ये राज्यातील सोयाबीनच्या अनुदान प्राप्त शेतकऱ्यांनी 48 टक्के तर कापसाच्या अनुदान प्राप्त शेतकरीमध्ये 46 टक्के शेतकऱ्यांनी आधार संमती देण्यात आलेली आहे . अशा शेतकऱ्यांना सदर अनुदानाचे पैसे थेट बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात येणार आहेत .

मागील वर्षी सोयाबीन व कापसाच्या दरांमध्ये झालेली प्रचंड घसरण , यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोसावा लागणारा नुकसान विचारात घेवून प्रति हेक्टरी ( कमाल 2 हेक्टर पर्यंत ) 5,000/- रुपये अनुदान देण्याची घोषणा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पांमध्ये करण्यात आलेली होती ,  त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना मदत निधी वितरीत करण्यात येत आहेत .

हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये गट क संवर्गातील 1846 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

यांमध्ये शेतकऱ्यांना क्षेत्रानुसार किमान 1000/- रुपये तर कमाल 02 हेक्टर मर्यादेत 10,000/- रुपये अनुदानाचे वितरण करण्यात येणार आहेत . याकरीता राज्य शासनांस एकुण 4194 कोटी 68 लाख रुपयांचा निधी लागणार आहे . यापैकी कापुस उत्पादक शेतकऱ्यांना 1,548 कोटी 34 लाख रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2646 कोटी 34 लाख रुपयांची रक्कम वितरीत करण्यात येणार आहे .

Leave a Comment