कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत करणेबाबत व अन्य प्रश्नांबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.22.08.2024

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ contractual employee imp shasan nirnay ] : राज्य शासन सेवेतील समग्र शिक्षा योजना अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात शिफारशी करण्यासाठी समितीचे गठण करणेबाबत राज्य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 22 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी  सन 2000-2001 पासून देशभरात सुरु झाली असून , शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दिनांक 18.01.2002 च्या शासन निर्णयानुसार सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी राज्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला व सदर अभियानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद , मुंबई यांच्याकडे सोपविण्यात आली आहे .

केंद्र शासनांच्या सर्व शिक्षा अभियान , राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक शिक्षण या योजनांचे एकत्रिकरण करुन सन 2018-19 पासुन केंद्रीय योजना समग्र शिक्षा योजना अंमलात आली आहे , राष्ट्रीय शैक्षणिक धोरण , 2020 मधील शिफारशींच्या अनुषंगाने समग्र शिक्षा योजनांची पुनर्रचना करण्यात आली आहे . सदर योजनांच्या केंद्र व राज्य हिसांचे प्रमाण 60:40   असे आहेत .

सदर समग्र शिक्षा योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या करार कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत , शासनांस शिफारशी करण्यासाठी राज्य प्रकल्प संचालक ( समग्र शिक्षा ) महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद , मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली 10 सदस्यीय समितीचे गठण करण्यात आले आहेत .

हे पण वाचा : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या तब्बल 1027 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

सदर समितीने या करार कर्मचाऱ्यांच्या शासनसेवेत समायोजन व अन्य प्रश्नांबाबत अन्य राज्यांमध्ये या योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या करार कर्मचाऱ्यांची नियुक्ती , मानधन व अन्य सेवाशर्ती याबाबत अभ्यास करुन शासनांस एका महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .  

Leave a Comment