मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनांच्या माध्यमातुन राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी !

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ cm yuva karya prashikshan yoajana ] : राज्य शासनांकडुन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहेत , सदर योजनांच्या माध्यमातुन राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहेत . सदर योजनांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात ..

जगांमध्ये सर्वात तरुणांची संख्या भारतात आहे , तर भारतांध्ये महाराष्ट्राची संख्या उत्तर प्रदेश नंतर 02 नंबरवर आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतुन राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात नाविन्यपुर्ण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तयार करण्यात आले आहेत .

सदर प्रशिक्षण पुर्ण केल्याच्या नंतर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहेत , सदर प्रशिक्षण पुर्ण केल्याच्या नंतर सहा महिन्यांचे प्रमाणपत्र दिले जाणार आहेत , तर त्यांना सदर प्रमाणापत्र भविष्यांमध्ये उपयोगात पडणार आहेत . सदर प्रशिक्षण कालावधीमध्ये उमेदवारांस दरमहा विद्यावेतन देण्याची तरतुद देखिल करण्यात आलेली आहे . यामुळे प्रशिक्षण कालावधीमध्ये , उमेदवारांना आर्थिक लाभ देखिल मिळणार आहेत .

हे पण वाचा : जिल्हा परिषद पालघर अंतर्गत 1,891 जागेसाठी महाभरती , Apply Now !

सदरची योजना ही खाजगी उद्योजक  व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने तरुण वर्गांकरीता रोजगार उपलब्ध करण्यासाठी तयार करण्यात आली आहे . यांमध्ये शैक्षणिक अर्हता नुसार , बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकरीता 6000/- रुपये पदवी उत्तीर्ण करीता 8000/- रुपये तर पदव्युत्तर विद्यार्थ्यांकरीता 10,000/- रुपये विद्यावेतन दिले जाणार आहेत .

सदरची विद्यावेतनाची रक्कम ही महाडीबीटी मार्फत अदा केली जाणार आहे . सदरचे प्रशिक्षण पुर्ण केल्याच्या नंतर सदर काम सुरु ठेवायचे कि स्वत : चा रोजगार करायचा हे विद्यार्थ्यांवर अवलंबून असणार आहेत .

अर्ज कसा कराल ? सदर योजनांच्या माध्यमातुन लाभ घेण्याकरीता  https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .

Leave a Comment