शासकीय योजनांचे प्रचार व प्रसिद्धी करिता राज्यात तब्बल 50,000 मुख्यमंत्री योजना दुतांची नेमणूक ; जाणून घ्या पात्रता , मानधन !

Spread the love

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ cm mukhyamanyri yojana doot ] : शासनाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धीकरिता मुख्यमंत्री योजना दुत  राज्यात राबवली जात असून , सदर योजनांच्या माध्यमातून राज्यातील तब्बल पन्नास हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत . सदर योजना दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .

सदर योजना दुताची कामे राज्यातील नागरिकांना शासकीय योजनांच्या माहिती देणे , योजना कार्यक्रम राबवणे नागरिकांना योजनांच्या अर्जाकरिता मदत करणे, विविध योजनांच्या कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेऊन नागरिकांना योजना विषयक माहिती देणे अशा विविध कामाकरिता सदर योजना दुधाची निवड करण्यात येणार आहे .

योजना दुतांच्या निवडीसाठी आवश्यक पात्रता : योजना दुतासाठी उमेदवाराचे वय 18-35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर उमेदवार हा कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे.  त्याच्याकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक असेल , त्याचबरोबर सदर उमेदवार हा राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असेल त्याच्याकडे आधार कार्ड व बँकेचे खाते संलग्न केलेले असावेत .

योजना दुधासाठी आवश्यक कागदपत्रे : योजना दुत  निवडीकरिता उमेदवाराकडे आधार कार्ड , पदवी उत्तीर्ण कागदपत्रे , रहिवासी प्रमाणपत्र बँक खात्याचा तपशील पासपोर्ट फोटो , हमीपत्र इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक असेल .

हे पण वाचा : प्रधानमंत्री किसान योजना अंतर्गत 18 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ; आताची मोठी अपडेट !

सदर योजना दुतास प्रतिमहा दहा हजार रुपये एवढे ठोक मानधन देण्यात येईल , याकरिता सहा महिन्यांचा करार केला जाणारा असून कोणत्याही परिस्थितीत सदर करार वाढवता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत . सदर योजना दुत प्रत्येक ग्रामपंचायत साठी 01  व शहरी भागामध्ये 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दुत या प्रमाणात राज्यात तब्बल 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे .

याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता लवकरच संकेतस्थळ उपलब्ध करून दिले जाणार आहेत , त्यानुसार पात्र अर्जांची छाननी करून संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने आवेदन प्रक्रिया राबवली जाणार आहे .

Leave a Comment