E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ cabinet nirnay about state employee – new pension , transfer & payment increase ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन सह तीन महत्वपुर्ण निर्णय काल दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या राज्य कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे .
01.राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना : राज्य शासकीय / निमशासकीय ( जिल्हा परिषद ) कर्मचाऱ्यांना केंद्र सरकार प्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करणेबाबत , काल झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला आहे . या सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर शेवटच्या वेतनाच्या 50 टक्के इतके निवृत्तीवेतन व त्यावरील डी.ए वाढ त्याचबरोबर निवृत्तीवेतनाच्या 60 टक्के इतके कुटुंबनिवृत्तीवेतन व त्यावरील डी.ए वाढ मिळणार आहे .
सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना NPS धारक कर्मचाऱ्यांना दिनांक 01 मार्च 2024 पासुन लागु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . एनपीएस योजना लागु असलेल्या पैकी जे सेवानिवृत्त झाले आहेत , अशांना दिनांक 29 फेबुवारी 2024 पर्यंतच्या कालावधीत सदर पेन्शन प्रणाली अंतर्गत वार्षिकी मधील लाभ लागु करण्यात येणार आहेत , सदर निवृत्तीवेतनधारकांना देखिल सदर सुधारित निवृत्ती वेतन व एनपीएस योजनांचा विकल्प द्यावा लागणार आहे .
सदर योजना अंतर्गत त्याच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या 60 टक्के इतकी परताव्याची रक्कम ही शासनांकडे भरणा करणे अनिवार्य असणार आहे . सदरचा निर्णय हा राज्यातील मान्यता प्राप्त अनुदानित शैक्षणिक संस्था , कृषीत्तेर विद्यापीठे व त्यांच्यांशी संलग्न असणारी अनुदानित अशासकीय महाविद्यालये व कृषी विद्यापीठांमधील कर्मचारी जे एनपीएस प्रणालीचे सभासद आहेत , व सर्व अटींचे पुर्तता करीत आहेत . अशा कर्मचाऱ्यां संदर्भात योग्य त्या फेरफारांसह सदरचा निर्णय हा जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांना लागु असणार आहेत .
02.शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या 30 ऑगस्ट पर्यंत : राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या दिनांक 30 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्याचा निर्णय सदर मंत्रीमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे . याकरीता शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध नियम 2005 मध्ये सुधारणा करण्यात करण्यात येणार आहेत .
03.गटप्रवर्तकांच्या मानधनांमध्ये वाढ : राज्यातील आरोग्य विभाग अंतर्गत कार्यरत गटप्रवर्तकांच्या मानधनांमध्ये 4 हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे . गट प्रवर्तकांना क्षेत्रीय भेटी तसेच आशांवरील पर्यवेक्षणांच्या दृष्टीने दौरे करावे लागतात , यामुळे गटप्रवर्तकांच्या मानधनांमध्ये वाढ करण्याचा राज्य शासनांने मोठा निर्णय घेतला आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..