E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ bus mahamandal employee nirnay ] : बस महामंडळ कर्मचाऱ्यांचा ऐन गणेशोत्सव सणाच्या कालावधीत दिनांक 3 सप्टेंबर 2024 पासून विविध मागण्याकरिता बेमुदत संप पुकारला होता . सदर संपामध्ये बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या एकूण 13 संघटना एकत्रित येऊन आंदोलन करीत होते . त्यामुळे ऐन सणाच्या कालावधीत महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसणार होता , यामुळे बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ केल्याने , अखेर संप मागे घेण्यात आला आहे .
सणासुदीच्या कालावधीमध्ये प्रवाशांच्या गैरसोयी होत असल्याने , राज्य सरकारला बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या . यामुळे सदर संप कामगार संघटनांनी मागे घेतला आहे . बस महामंडळ कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महामंडळ कर्मचाऱ्यास वेतन दिले जावे , तसेच बस महामंडळ कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा आदी मागणीकरिता संप करण्यात आला होता .
काल दिनांक 04 सप्टेंबर रोजी सह्याद्री अतिथी गृहावर माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या 13 संघटनांच्या पदाधिकाऱ्यासोबत बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या . यामध्ये दिनांक 01 एप्रिल 2020 पासून बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सरसकट सहा हजार पाचशे (6500/- ) रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
बस महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मान्य करण्यात आलेल्या मागण्या : सगळे बैठकीमध्ये चर्चा आणखी दिनांक 01 एप्रिल 2020 पासून कर्मचाऱ्यांना सरसकट मूळ वेतनामध्ये 6500/- इतके वाढ करण्यात आली आहे , त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्यांना जुलै 2016 ते जानेवारी 2020 या कालावधीमधील प्रलंबित महागाई भत्ता दिला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
त्याचबरोबर राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वार्षिक वेतनवाढी तसेच घरभाडे भत्ता लागू करण्यात येणार आहे , त्याचबरोबर सदर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवेतील कॅशलेस योजना लागू केली जाणार आहे . सदर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना एक वर्षाचे मोफत बस सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे , त्याचबरोबर सदर आंदोलनातील सहभागी कर्मचाऱ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..