शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मिळणार नुकसान भरपाई ;  प्रशासनास पंचनामे करण्याचे निर्देश .

Spread the love

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ ativrushi nukasan bharapai nirnay ] : राज्यामध्ये यावर्षी विदर्भ,  मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे , यामुळे पिकांची नुकसान होताना दिसून येत आहे . दरवर्षीपेक्षा यावर्षी मराठवाडा , विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे . यामुळे सोयाबीनला अति पावसामुळे नुकसान होताना दिसून येत आहे . ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत देण्याकरिता प्रशासनाला पंचनामे करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून दिली आहेत .

राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामध्ये अतिवृष्टी मुळे झालेल्या भागाची पाहणी केली व प्रशासनास नुकसान भरपाई करिता तात्काळ पंचनामे करून राज्य शासनाकडे सादर करण्याची निर्देश देण्यात आली आहे .

यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी पदाधिकारी उपस्थित होते . सदर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पंचनामे करून भरपाई दिली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री यांच्याकडून देण्यात आले .

हे पण वाचा : पुणे महानगरपालिका मध्ये तब्बल 681 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया ; अर्ज करायला विसरू नका !

विदर्भ , मराठवाडा भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मिळणार नुकसान भरपाई : यावर्षी विदर्भ व मराठवाडा भागांमध्ये अतिवृष्टी झाल्याने ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे , अशा शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकाकरिता नुकसान भरपाई दिली जाणार आहे यामुळे महसूल विभागाकडून तात्काळ पंचनामे करण्याचे कामकाज सुरू करण्यात आली आहे . नुकसान भरपाई देताना पिके व क्षेत्र गृहीत धरले जाणार आहेत .

या निर्णयामुळे अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम लवकरच खात्यामध्ये मिळणार आहे .  अतिवृष्टीमुळे मराठवाडा भागामध्ये सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . सोयाबीन पीक सध्या फळांमध्ये असून , अति पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे .

शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर  अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.

Leave a Comment