कर्मचाऱ्यांना तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण सुधारित GR निर्गमित दि.11.09.2024

Spread the love

E-marathipepar खुशी पवार प्रतिनिधी  [ ashasit pragati yojana sudharit shasan nirnay ] : कर्मचाऱ्यांना तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करणेबाबत राज्य शासनांच्या नगर विकास विभाग मार्फत अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

महाराष्ट्र राज्यातील राज्यस्तरीय नगरपरिषद संवर्गा अधिकारी व नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींमधील कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या दिनांक 02 मार्च 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार विहीत करण्यात आलेल्या तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुढे दिलेल्या अटींच्या अधिन राहुन लागु करण्याची मान्यता देण्यात येत आहे .

सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , सदर योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात वित्त विभाग शासन निर्णय 02 मार्च 2019 , तसेच दिनांक 01 फेब्रुवारी 2020 , दिनांक 07 ऑक्टोंबर 2022 व दिनांक 21 फेब्रुवारी 2024 मधील तरतुदीप्रमाणे कार्यपद्धती विहीत निकष व अनुज्ञेयता लागु राहणार असतील , असे नमुद करण्यात आलेली आहे .

सदरच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दिनांक 01 जानेवारी 2016 पासुन लागु राहणार असतील , असा निर्णय देण्यात आला आहे , तसेच दिनांक 01 जानेवारी 2016 ते सदर आदेशाच्या दिनांकापर्यंत काल्पनिक वेतननिश्चिती करुन प्रत्यक्ष लाभ या आदेशाच्या दिनांकापासुन देण्यात यावा , तसेच थकबाकी अनुज्ञेय असणार नाहीत , असे नमुद करण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : राज्य अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण GR निर्गमित दि.11.09.2024

याकरीता येणारा अतिरिकत खर्च हा नगरपरिषदा तसेच नगरपंचायतीच्या स्व-उत्पन्नातुन भागविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment