E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ arjit raja rokhikaran sudharit shasan nirnay ] : दिनांक 01 जानेवारी 2016 अथवा त्यानंतर सेवानिवृत्त अथवा शासकीय सेवेत असताना मृत्यु झालेल्या तसेच होणाऱ्या राज्यातील शालेय शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत खाजगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी ज्यांना अर्जित रजा देय आहे , अशांना अर्जित रजा रोखीकरणाच्या परिगणा करण्याकरीता वेतन ही संज्ञेचा अर्थ मुळ वेतनाच्या व्याख्येनुसार , करण्यात आला आहे .
राज्य शासनांच्या वित्त विभागाच्या दिनांक 15 जानेवारी 2001 रोजीच्या शासन निर्णयानुसार , अर्जित रजेचे रोखीकरण करण्याकरीता 240 दिवसांची मर्यादा ही 300 दिवसांपर्यत वाढविण्यात आलेली आहे . तर राज्य शासनांच्या वित्त विभागमार्फत दिनांक दि.09.04.2001 व दि.27.08.2009 रोजीच्या निर्णयानुसार , राज्यांमधील खाजगी मान्यताप्राप्त असणाऱ्या प्राथमिक , माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयांमधील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांना लागु करण्यात आलेला आहे .
सदर निर्णयांच्या अनुषंगाने राज्यातील खाजगी शाळातील ( मान्यताप्राप्त ) शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी ( ज्यांना अर्जित रजा देय आहे असे ) अशा कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण बाबतचा GR निर्गमित होण्याची बाब राज्य शासनांच्या विचाराधीन होती . यानुसार शालेय शिक्षण विभाग मार्फत दि.04.05.2022 रोजी निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .
हे पण वाचा ; राज्यात विविध सहकारी, खाजगी तसेच अनुदानित शाळा मध्ये 1150+ जागेसाठी महाभरती 2024.
सदर निर्णयानुसार अर्जित रजा देय करण्यासाठी वेतन या संज्ञेचा अर्थ मुळ वेतनाच्या व्याख्येनुसार करण्यात आला आहे .तसेच कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सुधारित वेतन संरचना प्रमाणे वेतन विचारात घेवून त्यांना नियम प्रमाणे अनुज्ञेय असणाऱ्या शिल्लक अर्जित रजेच्या संबंध मधील रजा वेतनाची सममुल्य रोखी रक्कम ठोक रकमेत रोखीने प्रदान करण्याचे नमुद करण्यात आले आहेत .
सदर निर्णय हा राज्य शासनांच्या वित्त विभाग मार्फत दि.06.04.2022 रोजी निर्गमित निर्णयाच्या सहमतीने निर्गमित करण्यात आला आहे .
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..