अन्नपुर्णा योजना अंतर्गत 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देणेबाबत , सुधारित महत्वपुर्ण GR निर्गमित दि.04.09.2024

Spread the love

E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Annapurna yojana shasan nirnay ] : मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना अंतर्गत राज्यातील पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना वर्षाला 03 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करुन देणेबाबत , राज्य शासनांच्या अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांकडून दिनांक 04 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना संदर्भात दिनांक 30 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता  , सदर निर्णयात काही सुधारित तरतुदी करण्यात आलेल्या आहेत , यांमध्ये तेल कंपन्यांनी राज्य शासनांकडून प्रति सिलेंडर द्यावयाची अंदाजे रुपये 530/- इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याचे तसेच लाभार्थ्यांची माहीती दर आठवड्याला शासनांस उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

तसेच राज्य सरकारच्या मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना अंतर्गत द्यावयाच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण हे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड , हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड व इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड या केंद्र सरकारच्या तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल असे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच सदर योजनांमध्ये ग्राहकांस एका त्रेमासिकांमध्ये एकाच सिलेंडर करीता अनुदान देय असणार आहेत , तसेच प्रधान मंत्री उज्ज्वला योजन व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या 02 योजनांच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरच्या लाभ देताना द्विरुक्ती होणार नाही , याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : भारतीय स्टेट बँकेत विविध पदांच्या एकुण 58 जागेकरीता पदभरती , लगेच करा आवेदन ..

अन्नपुर्णा योजना अंतर्ग तेल कंपन्यांनी प्रथम सिलेंडरकरीता लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपुर्ण रक्कम ग्राहकांकडून घेण्याचे निर्देश आहेत तर त्यानंतर राज्य शासनांकडून द्यावयाचे अंदाजे रुपये 830/- प्रति सिलेंडर इतकी रक्कम तेल कंपन्यांनी ग्राहकांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे देण्याची तरतुद करण्यात आलेली आहे .

या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्याकरीता खालील लिंकवर क्लिक करावेत ..

शासन निर्णय

Leave a Comment