राज्यातील माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये 20 हजार रुपयांची वाढ करणेबाबतचा प्रस्ताव सादर ; पेन्शनवर खर्च वाढणार .

Spread the love

E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ amadar pension increase prastav ] : राज्यातील माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये आणखीन 20,000/- रुपये वाढ करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती सुत्रांकडून समोर येत आहेत .

एकदा निवडून आलेल्या आमदारांना मासिक 50,000/- रुपये पेन्शन दिले जाते , तर पुढील टर्म मध्ये निवडुन आल्यास , प्रत्येक टर्म करीता 2000/- रुपयांची वाढ करण्यात येते . सध्या स्थितीमध्ये राज्यात 900 माजी आमदारांच्या पेन्शन करीता तब्बल 70 कोटी रुपयांचा खर्च येतो .

सदर माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये आणखीण 20,000/- रुपयांच्या वाढीकरीता प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आला असल्याची माहीती समोर येत आहे . एकदा निवडणुक आल्याच्या नंतर आमदारांना त्यांचे आयुष्य सुखर जावे याकरीता , त्यांना दरमहा 50,000/- पेन्शन देण्यात येते . सध्य स्थितीमध्ये राज्यात 15 माजी आमदारांना 1 लाखापेक्षा अधिक पेन्शन मिळते .

सदर आमदारांच्या पेन्शन , वेतन करीता दरवर्षी 207 कोटी रुपये इतकी रक्कम खर्च करावे लागते . याच पार्श्वभुमीवर राज्य सरकारी कर्मचारी यांना जुनी निवृत्तीवेतन ( Old Pension ) योजना लागु करण्याची मागणी करण्यात येत आहेत .

हे पण वाचा : सैन्य कल्याण शैक्षणिक सोयायटी अंतर्गत 35,000+ जागेसाठी पदभरती , अर्ज करायचे विसरु नका !

सध्य स्थितीमध्ये राज्यात एकुण 366 आमदार ( विधानसभा / विधानपरिषद ) सदर आमदारांना प्रत्येकी 3 लाख रुपये दरमहा वेतन दिले जाते . तर राज्यात सध्यस्थितीत 900 माजी आमदार आहेत , त्यांना दरमहा 50 हजार ते 1 लाख रुपये पेन्शन दिली जाते . सदर आमदारांच्या वेतन / पेन्शन करीता प्रतिवर्षी 207 कोटी इतका खर्च येतो .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment