परळीत 21 ऑगस्टपासुन 5 दिवस राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन !

Spread the love

E-Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state krushi Mahotsav at parali ] : दिनांक 21 ऑगस्टपासून पुढील 5 दिवस राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे करण्यात आले आहेत . या वेळी कृषी क्षेत्रांशी निगडीत विविध प्रदर्शन , पशुप्रदर्शन तसेच शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री मा.धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आली आहे .

कृषी विद्यापीठांने लावलेले विविध नवनविन शोध तसेच आधुनिक उपकरणे , शासनांचे विविध अन्य प्रकारचे उपक्रम तसेच उत्पादने यांची माहिती मिळावी या उद्देशाने कृषी विभागांकडून सदर महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहेत , सदर महोत्सवाचे उद्धाटन दिनांक 21 ऑगस्ट रोजी दुपारी 12.00 वाजता केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान , राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत .

या महोत्सवांमध्ये शेती करण्यासाठी संशोधित आधुनिक यंत्रसामुग्री , नविन संशोधन , विविध उत्पादने , पशुची विविध प्रजाती तसेच शेती करण्यासाठी उपयुक्त असणारी माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे .

हे पण वाचा : राज्यात अनुदानित शाळा / महाविद्यालये , सहकारी बँका , खाजगी क्षेत्रातील तब्बल 1500+ जागेसाठी महाभरती !

याकरीता कृषीमंत्री मा.धनंजय मुंडे यांच्याकडून परळी येथील शासकीय विश्राम गृहात प्रत्यक्ष हजर राहून महोत्सवाची पुर्व तयारी बाबतचा आढावा घेण्यात आला . यावेळी बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी , पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी , तसेच कृषी विभागाचे सह संचालक , जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुभाष साळवे , महसुल पोलिस अधिकारी , तहसीलदार आदी . अधिकारी उपस्थित होते .

योवळी आसन व्यवस्था , मंडप , स्टॉल्स , भोजन व्यवस्था , सुरक्षा आदी बाबींची पाहणी करुन व्यवस्थापन उत्तमरित्या करण्याचे निर्देश मा. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून देण्यात आले आहेत .

Leave a Comment