E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update news punjabrao dakh ] : हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी राज्यातील नवा हवामान अंदाज व्यक्त केला आहे . सदर अंदाजानुसार राज्यात 11 दिवस मुसळधार पाऊस पडणार आहे , नेमक्या कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट दिला आहे , ते पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाजानुसार , राज्यांमध्ये दिनांक 20 सप्टेंबर पर्यंत राज्यातील हवामान हा कोरडा रोहील तर त्यानंतर मात्र राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होईल , असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस : राज्यात दिनांक 21 सप्टेंबर ते दिनांक दि.02 ऑक्टोबर या 11 दिवशी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता पंजाबरावांनी व्यक्त केली आहे . सदर कालावधीमध्ये पाऊस हा मुसळधार पडणार असल्याने पिक काढणीवर वितरीत परिणाम होण्याची संभावना व्यक्त करण्यात आली आहे .
कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस : सदर दिनांक 21 सप्टेंबर ते 02 ऑक्टोंबर पर्यंत राज्यातील उत्तर महाराष्ट्र , विदर्भ तसेच मराठवाडा विभागांमधील मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे . सदर कालावधीमध्ये राज्यातील सांगली , लातुर , नांदेड , सातारा , सांगली , कोल्हापुर , सोलापुर , धाराशिव , अहमदनगर , बीड , पुणे , नांदेड , परभणी तसेच कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .
हे पण वाचा : राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ;
शेतकऱ्यांना महत्वपुर्ण सल्ला : सदर कालावधीमध्ये राज्यात सोयाबीन काढण्याचा काळ आहे , या काळात सोयाबीन , उडीद हे पिक पावसाचा स्थिती लक्षात घेवून का सोयाबीन काढणी करुन घेण्याचा सल्ला हवामान तज्ञ पंजाबरावांकडून देण्यात आला आहे .
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..