E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee old pension scheme cabinet nirnay vachan ] : सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर पहिल्याच कॅबिनेट मध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना जशाच्या तशी लागु करण्याचे वचन काल दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी शिर्डी येथे झालेल्या पेन्शन महाअधिवेशन दरम्यान काँग्रेसचे नेते नाना पटोले व शिवसेना ( उ.बा.ठाकरे ) पक्षाचे अध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दिले आहेत .
राज्यात काल दिनांक 15 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे महा-अधिवेशन झाले यावेळी , राज्यातील सर्वच जिल्ह्यातून लाखो कर्मचारी उपस्थित होते .कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन (old pension ) पेन्शन हवी आहे , कारण नविन पेन्शन योजनांमध्ये तसेच सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना असो कि युनिफाईड पेन्शन असो या पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे पेन्शन अथवा इतर भत्ते दिले जात नाहीत .
तसेच नविन पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आलेले आहेत , यामुळे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे सदर सुधारित पेन्शन योजनांमध्ये फायदा होत नाहीत . यामुळे कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन करीता सन 2005 पासुन वेळोवेळी आंदोलने , मोर्चा काढून आपली मागणी मान्य करुन घेण्यासाठी लढा देत आहेत .
हे पण वाचा : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढीचा प्रस्तावास तुर्तास मंजुरी नाही ..
पहिल्याच कॅबिनेट बैठकीत जुनी पेन्शनचा निर्णय घेणार : महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यास , सत्ता स्थापने नंतरच्या पहिल्याच कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठकीमध्ये , राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ( Old Pension ) योजना जशाच्या तशी लागु करण्याचे वचन उद्धव ठाकरे व नाना पटोले यांच्या कडून देण्यात आले आहेत .
दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी शिर्डी येथे झालेल्या कर्मचाऱ्यांच्या महा-अधिवेशन दरम्यान उद्धव ठाकरे व नाना पटोले यांनी प्रमुख उपस्थित लावुन याबाबत आपले मत व्यक्त केले . यावेळी कर्मचाऱ्यांकडून देखिल चांगला प्रतिसाद मिळाला .
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..