राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ state employee mahamorcha in all Maharashtra news ] : राज्यातील सर्वच शाळा दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे ,कारण त्या दिवशी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांकडून महामोर्चा काढण्यात येणार आहेत .

राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र ऐवून नुकतेच पुणे येथे झालेल्या सदर संघटनांच्या बैठकीमध्ये सदर महामोर्चा बाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे . सदरचा महामोर्चा हा राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांवर काढण्यात येणार असल्याने दिनांक 25 सप्टेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे .

यांमध्ये राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संचमान्यतेचा दिनांक 15.03.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला तसेच कंत्राटी शिक्षक पदभरती दिनांक 05.09.2024 रोजीचा निर्णय हा शिक्षक तसेच खेडोपाड्यावरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक निर्णय असल्याने , सदरचे दोन्ही निर्णय तातडीने रद्द करण्यात यावेत . या प्रमुख मागणीकरीता राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांकडून दिनांक 25.09.2024 रोजी सर्व शाळा बंद ठेवून आपल्या जिल्ह्यातील कार्यालयांसमोर मोर्चा काढणार आहेत .

हे पण वाचा : उद्या 16 सप्टेंबर रोजी सुट्टी बाबत विविध जिल्हाधिकारी यांचे परिपत्रक !

सदरच्या शासन निर्णयांमुळे राज्यातील तब्बल 15000 शिक्षक कमी होणार आहेत , तर तब्बल 2 लाख विद्यार्थ्यांना शिक्षणांसाठी इतत्र भटकंती  करावी लागणार आहे . राज्य शासनांच्या शिक्षण अधिनियम 2009 नुसार , राज्यात शिक्षक निश्चितीचे नियम तयार करण्यात आलेले असून , सदर नियमावली तयार होवून 13 वर्षे पुर्ण झाले तरी दखिल सदरचे नियम राज्य शासनांकडून लागु करण्यात आलेले नाहीत .

तसेच नविन सुधारित आकृतिबंध राज्य शासनांकडून लागु करण्यात आलेले नाहीत . यामुळे विद्यार्थ्यांना मोफत व सक्तिच्या शिक्षणांपासुन वंचित ठेवले जात आहेत . यामुळे सदरचे वरील नमुद शासन निर्णय रद्द करण्यात यावेत , याकरीता दिनांक 25.09.2024 रोजी राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी , कार्यालयांवर आंदोलन करण्यात येणार आहेत .

Leave a Comment