E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee retirement age news ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढीबाबतच्या प्रस्तावाला राज्य शासनांकडून तुर्तास मंजुरी नसल्याचे वृत्त समोर येत आहेत . यामुळे सेवानिवृत्तीचे वय वाढीबाबत कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार नाही .
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे केंद्र सरकार तसेच इतर 25 राज्य सरकार प्रमाणे 60 वर्षे करण्याची मागणी राज्य कर्मचाऱ्यांची आहे . याबाबत राज्य शासनांकडून अधिकृत्त प्रस्ताव देखिल तयार करण्यात आला आहे .परंतु सदर प्रस्तावा तुर्तास मंजुरी मिळणार नसल्याचे वृत्त समोर येत आहेत . कारण मंत्रालयीन स्तरावर निवृत्तीचे वय वाढीबाबत अद्याप कोणत्याही प्रकारच्या हालचाली सुरु नसल्याचे , सुत्रानुसार वृत्त समोर येत आहे . यामुळे निवृत्तीचे वय 58 वर्षेच कायम राहणार आहेत .
गट क , ब व अ संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्षे आहेत , यांमध्ये आणखीण 02 वर्षांची वाढ करावी अशी मागणी आहे . तर राज्य शासन सेवेतील गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्षे आहेत .सध्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचा लाभ नाही तसेच नविन सुधारित पेन्शन प्रणालीमध्ये किमान सेवानुसार निवृत्तीवेतनाची तरतुद आहे , यामुळे सेवानिवृत्तीचे वयांमध्ये वाढ करण्याची मागणी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून होत आहे .
हे पण वाचा : नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांच्या 700 जागेसाठी महाभरती , Apply Now !
निवृत्तीचे वय वाढीबाबत राज्य शासनांकडून अद्याप कोणत्याही हालचाली दिसून येत नसल्याने , याबाबतचा निर्णय विद्यमान सरकारकडून घेण्याची शक्यता कमीच दिसत आहे . यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची सदर मागणी पुर्ण होण्यासाठी वाट पाहावा लागणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..