E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ 7th pay commission vetan truti nivaran samiti Shasan Nirnay ] : राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटीतील त्रुटींचे निवारण करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ला मुदतवाढ देणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटी बाबत विविध न्यायालयातील दाखल रिट याचिकांच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार , तपासणी करून त्याबाबत शिफारस करण्याकरिता तसेच मंत्राल्लीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सातवा वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या त्रुटींची तपासणी करून शिफारस करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ची स्थापना करण्यात आली आहे .
सदर समितीला अहवाल सादर करण्याकरिता नियुक्तीच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या म्हणजेच दिनांक 15 सप्टेंबर 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे , समितीचे कामकाज अद्याप सुरू आहे . त्यामुळे उर्वरित कामकाज पूर्ण करून अहवाल सादर करण्यासाठी समितीला मुदतवाढ देण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन आहे .
सदर वित्त विभागाच्या दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार सातवा वेतन आयोगातील वेतनत्रुटी बाबत विविध न्यायालयातील दाखल रीट याचिकांच्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तपासणी करून त्याबाबत शिफारस करण्याकरिता तसेच मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून प्राप्त झालेल्या इतर संवर्गाच्या सातवा वेतन आयोगाच्या अनुषंगाने निर्माण झालेल्या..
त्रुटींची तपासणी करून शिफारसी करण्याकरिता वेतन त्रुटी निवारण समिती 2024 ला आपला अहवाल सादर करण्यासाठी दिनांक 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सदर शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे ..
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..