यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा बाजारभाव 6000/- पार जाणार ; जाणून घ्या सविस्तर माहिती ..

Spread the love

E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ soyabean rate increase in future update ] : यंदाच्या वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा प्रति क्विंटल 6000/- रुपये बाजारभाव जाणार असल्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे . सोयाबीनच्या बाजारभावामध्ये अचानक वाढ झाली नाही तर बाजारात सोयाबीनची मोठी तुट व आंतरराष्ट्रीय बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली असल्याने , सोयाबीनच्या बाजारांमध्ये अचानक वाढ झाल्याचे दिसून येत आहेत .

मागील आठवड्यापासून सोयाबीनच्या दरांमध्ये मोठी वाढ होताना दिसून येत आहेत , काल दिनांक 09 सप्टेंबर रोजी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्वाधिक 5050/- रुपये इतका सोयाबीनला बाजारभाव मिळाला आहे . यंदाच्या हंगामातील हा सर्वाधिक बाजारभाव ठरला आहे .

तर राज्यातील सोयाबीनचा सर्वसाधारण भाव पाहिला असता 4300/- रुपये इतका आहे , मागील दोन आठवड्यापुर्वी हा दर 3900/- रुपये इतका होता . तर महाराष्ट्र राज्यात केंद्र सरकारकडून ठरवून देण्यात आलेल्या 4892/- रुपये इतक्या हमीभावाने खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आल्याने , शेतकऱ्यांना आणखीन मोठा दिलासा मिळालेला आहे .

हे पण वाचा : राज्यातील या 14 जिल्ह्यातीलच शेतकऱ्यांना गणेश चतुर्थीनिमित्त आनंदाचा शिधा !

सोयाबीनचा बाजारभाव 6000/ पार जाणार : यंदाच्या वर्षी देशांमध्ये सोयाबीन उत्पादक प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे . यामुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन येत आहेत . परिणामी सोयाबीन उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात घट दिसून येणार आहे .

सध्यस्थिती मराठवाड्यातील परभणी , लातुर , धाराशिव , हिंगोली , यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने , सदर जिल्ह्यात सोयाबीन हे प्रमुख पिक घेतले जाते , या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पीकांची नुकसान होत आहेत . यामुळे यंदा सोयाबीनच्या घटत्या उत्पादनामुळे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्याचा अंदाज तज्ञांकडून देण्यात आलेला आहे .

शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर  अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.

Leave a Comment