E-marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ maharashtra state employee imp shasan nirnay about old pension ] : राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 09 सप्टेंबर 2024 रोजी राज्य शासनांच्या बांधकाम विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
केंद्र सरकारच्या अधिकारी / कर्मचारी यांना केंद्रीय नागरी / सेवा नियम 1972 / 2021 लागु करण्याचा एक वेळ पर्याय देणेबाबत , केंद्र शासनांच्या निवृत्तीवेतन व निवृत्तीवेतनधारकांचे कल्याण विभागाच्या दिनांक 03 मार्च 2023 रोजीच्या पत्रानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे . केंद्र सरकारच्या सदर निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनांच्या सेवेत जे अधिकारी / कर्मचारी दिनांक 01 नोव्हेंबर 2005 रोजी अथवा त्यानंतर शासन सेवेत ..
नियुक्त करण्यात आले आहेत , तथापि त्यांची पदभरतीची जाहीरात / अधिसुचना दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी निर्गमित झालेली आहे . अशा राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्ती वेतन ) नियम 1982 , महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम , 1998 व अनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागु करण्यासाठी एक वेळ पर्याय राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 02 फेब्रुवारी 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार देण्यात आलेला आहे .
तर सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत अधिक्षक अभियंता ( स्थापत्य ) व कार्यकारी अभियंता ( स्थापत्य ) संवर्गात सध्या कार्यरत असणाऱ्या व सदर निर्णयांमध्ये नमुद विवरणपत्रात दर्शविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची राज्य शासनांच्या सेवेतील प्रथम नियुक्ती ही महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा – 2004 नुसार म्हणजेच दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी पदभरतीची जाहीरात / अधिसुचना केल्यानुसार झालेली आहे .
या संदर्भातील सविस्तर निर्गमित शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..