राज्यातील NPS धारक अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय .

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra state employee finance department imp Shasan nirnay ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत दि.01.11.2005 नंतर सेवेत रुजु झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनांच्या वित्त विभागांकडुन दिनांक 09 मे 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागु आहे , अशा कर्मचाऱ्यांनी जर आपल्या पदाचा राजीनाम दिला असेल तर अशांना राज्य शासन सेवेत पुन्हा घेण्याची विनंती केली असल्यास , त्यांना सदर निर्णयांमध्ये नमुद करण्यात आलेल्या तरतुदींच्या अधिन राहुन पुन्हा शासन सेवेत घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निश्चित करण्यात येत आहेत .

जर एनपीएस धारक कर्मचाऱ्यांनी त्याची कार्यक्षमता अथवा सचोटी या व्यक्तीरिक्त अन्य काही सक्तीच्या कारणास्तव राजीनामा दिला असल्यास , व त्याने आपला राजीनामा देणे ज्या परिस्थितीमुळे भाग पडेल त्या परिस्थितीमध्ये महत्वाचा बदल झाल्याने त्याने राजीनामा मागे घेण्याची विनंती करणे आवश्यक असेल .

तसेच सदर राजीनामा अंमलात येण्याची दिनांक व राजीनामा मागे घेण्याबद्दल विनंती केल्याची दिनांक यांच्या दरम्यानच्या काळांमध्ये सदर संबंधित व्यक्तींची वर्तवणूक कोणत्याही प्रकारचे अनुचित असता कामा नयेत असे नमुद करण्यात आलेले आहेत .

हे पण वाचा : युनिफाईड पेन्शन योजनेत पेन्शन नेमकी कशी मिळणार ? मंत्रीमंडळाची मंजुरीनंतर , कर्मचाऱ्यांस पेन्शनचा पर्याय निवडण्याची संधी ..

तसेच राजीनामा परत घेतल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांस पदस्थापना देताना त्याचे पुर्वीचे अथवा समकक्ष पद अस्तित्वात असणे आवश्यक असणार आहेत . परंतु जर सदर कर्मचाऱ्यांने एखाद्या वाणिज्यिक कंपन्यांमध्ये अथवा इतर शासकीय मालकीच्या अथवा शासन नियंत्रणाखालील कंपनी , महामंडळ अथवा शासन सहाय्य असणाऱ्या संस्था / कंपन्या मध्ये नेमणुक होण्याच्या दृष्टीने शासन  सेवेतील पदाचा राजीनामा दिला असल्यास , सदर कर्मचाऱ्याचा राजीनामा मागे घेण्यात येवू नयेत असे नमुद करण्यात आले आहेत .

सदर निर्णय हा अस्थायी कर्मचाऱ्यांकरीता लागु राहणार नसल्याचे नमुद करण्यात आलेले  आहेत , तसेच सदरचा निर्णय हा सदर निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासुन लागु राहणार असल्याचे नमुद असून इतर विभागांना योग्य त्या फेरफारांसह लागु होईल असे नमुद करण्यात आले आहेत .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment