E-marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ District wise farmer held nidhi shasan nirnay ] : राज्यात माहे नोव्हेंबर 2023 ते माहे जुलै 2024 या कालावधीमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देणेबाबत , राज्य शासनांच्या महसुल व वन विभागांकडून दिनांक 05.09.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यात अतिवृष्टी तसेच पुर व चक्रिवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांच्या नुकसान झाल्यास पुढील हंगामांमध्ये उपयोगी पडावे याकरीता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरुपांमध्ये एका हंगामात एका वेळेस या यप्रमाणे राज्य आपत्ती निधीमधून विहीत दराने मदत देण्यात येत असते .
सदर शासन निर्णयानुसार सन 2023 ते माहे जुलै 2024 या कालावधीमध्ये झालेल्या अवेळी तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनांस प्राप्त झालेले आहेत ,यानुसार राज्य शासनांकडून नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीत राज्यांमध्ये विविध जिल्ह्यात अवेळी पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानी करता शेतकऱ्यांना मदत देण्याकरीता राज्य शासनांच्या महसुल विभागाच्याा दिनांक 01.01.2024 रोजीच्या ..
हे पण वाचा : सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये तब्बल 1180 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
निर्णयानुसार निश्चित करण्यात आलेल्या दरानुसार एकुण 307.2529 कोटी इतका निधी वितरीत करण्यास शासनांने मंजूरी दिली आहे . तसेच राज्य शासनांच्या दिनांक 24 जानेवारी 2023 रोजीच्या निर्णयानुसार सुचित केल्याप्रमाणे डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये निधी वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
सदर निर्णयांमध्ये नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 या कालावधीमध्ये शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरीता वितरीत करावयाचा जिल्हानिहाय तपशिल देण्यात आलेला आहे , याबाबत पुढील सविस्तर शासन निर्णय पाहावा ..
शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..