E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ ativrushi nukasan bharapai nirnay ] : राज्यामध्ये यावर्षी विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे , यामुळे पिकांची नुकसान होताना दिसून येत आहे . दरवर्षीपेक्षा यावर्षी मराठवाडा , विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे . यामुळे सोयाबीनला अति पावसामुळे नुकसान होताना दिसून येत आहे . ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मदत देण्याकरिता प्रशासनाला पंचनामे करण्याचे निर्देश राज्य शासनाकडून दिली आहेत .
राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांनी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यामध्ये अतिवृष्टी मुळे झालेल्या भागाची पाहणी केली व प्रशासनास नुकसान भरपाई करिता तात्काळ पंचनामे करून राज्य शासनाकडे सादर करण्याची निर्देश देण्यात आली आहे .
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी पदाधिकारी उपस्थित होते . सदर अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची पंचनामे करून भरपाई दिली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्री यांच्याकडून देण्यात आले .
विदर्भ , मराठवाडा भागातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे मिळणार नुकसान भरपाई : यावर्षी विदर्भ व मराठवाडा भागांमध्ये अतिवृष्टी झाल्याने ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे , अशा शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकाकरिता नुकसान भरपाई दिली जाणार आहे यामुळे महसूल विभागाकडून तात्काळ पंचनामे करण्याचे कामकाज सुरू करण्यात आली आहे . नुकसान भरपाई देताना पिके व क्षेत्र गृहीत धरले जाणार आहेत .
या निर्णयामुळे अतिवृष्टी भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम लवकरच खात्यामध्ये मिळणार आहे . अतिवृष्टीमुळे मराठवाडा भागामध्ये सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . सोयाबीन पीक सध्या फळांमध्ये असून , अति पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होत आहे .
शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..