E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ cotton & soyabean producer farmer GR ] : सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुरवणी मागणी द्वारे उपलब्ध झालेला 4194.68 कुटी रुपये इतका निधी पैकी 2516.80 कोटी रुपये 2024-25 मध्ये वितरित करण्याबाबत , राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस , सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्राकरिता सरसकट 1,000/- रुपये तर 0.2 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्राकरिता त्यांच्या क्षेत्रानुसार , प्रति हेक्टर पाच हजार रुपये ( कमाल 2 हेक्टर मर्यादेत) अर्थसाह्य देण्यात यावे , असे नमूद करण्यात आले आहे .
सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसाह्य देण्याकरिता जुलै 2024 मध्ये सन 2024 – 25 करिता 4194.68 कोटी रुपये इतका निधी पुरवणी मागणी द्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे . वित्त विभागाने मंजूर पुरवणी मागणीच्या 60 टक्के च्या मर्यादित रुपये 2516.80 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे . त्या अनुसरून 2516.80 कोटी रुपये निधी वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती .
सदर शासन निर्णय नुसार सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता 2516.80 कोटी रुपये निधी शासन निर्णयानुसार आयुक्त पुणे यांना अर्थसंकल्पिय वितरण प्रणाली द्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे .
यामध्ये पीक संवर्धन , कापूस सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना तसेच अर्थसहाय्य या लेखाशीच्या खाली सदर निधी खर्च करण्याचे निर्देश आयुक्त कृषी आयुक्तालय पुणे यांना देण्यात आली आहे .
या निर्णयामुळे राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत निधी म्हणून लवकरच बँक खात्यात कमाल 10,000/- रुपये वर्ग केले जाणार आहेत .
शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..