E-marthipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yoajana update news ] : लाडकी बहीनींचे पैसे अद्याप मिळाले नसतील तर ,अथवा अर्ज सादर करायचे अद्याप बाकी असतील अशा लाडकी बहीणींसाठी आत्ताची मोठी बातमी समोर येत आहेत .
लाडकी बहिण योजना ही आगामी काळामध्ये सत्ता आल्यानंतर निरंतर सुरु राहणार असल्याचे संकेत मा. मुख्यमंत्री यांच्या कडून देण्यात आली आहे , तर सदर योजना अंतर्गत आर्थिक लाभामध्ये वाढ करण्याचे संकेत देखिल देण्यात आले आहेत . म्हणजेच प्रति महा 1500/- रुपये वरुन 3000/-रुपये करण्याचे सुचक विधान मुख्यमंत्री यांच्याकडून देण्यात आले आहेत .
31 जुलै नंतर अर्ज सादर केलेल्या पात्र महिलांच्या खात्यात लवकरच पैसे मिळणार : ज्या महिलांनी सदर योजना अंतर्गत दिनांक 31 जुलै पर्यंत आवेदन सादर केले आहेत , अशा महिलांच्या बँक खात्यांमध्ये , दोन महिन्यांचे 3000/- रुपये हस्तांतरीत करण्यात आले आहेत . तर ज्यांनी दिनांक 31 जुलै नंतर आवेदन सादर केले आहेत , अशा बहीणींच्या खात्यांमध्ये उद्या पर्यंत बँक खात्यांमध्ये वर्ग केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे .
आत्तापर्यंत 80 लाख महिलांना मिळाला लाभ : सदर योजना अंतर्गत 80 लाख महिलांना दिनांक 14 ऑगस्ट पर्यंत बँक खात्यांमध्ये 3000/- रुपये वर्ग करण्यात आले आहेत .
हे पण वाचा : जिल्हा परिषद पालघर अंतर्गत 1,891 जागेसाठी महाभरती , Apply Now !
31 ऑगस्ट नंतरही करता येणार आवेदन : सदर योजना अंतर्गत पात्र महिलांना दिनांक 31 ऑगस्ट नंतरही आवेदन सादर करता येणार आहेत . यामुळे कागपत्रा अभावी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर न करु शकणाऱ्या महिलांना 31 ऑगस्ट नंतर देखिल निरंतर अर्ज दाखल करता येणार आहेत .
महाविकास आघाडीची सत्ता आल्यास , लाडक्या बहीनींच्या सन्मान राशीमध्ये वाढ करण्याचे आश्वासन : महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राज्यात विद्यमान सुरु असलेल्या लाडकी बहीनींना दरमहा 1500/- रुपये ऐवजी दरमहा 3000/- रुपये देण्याचे आश्वासन महाविकास आघाडीचे संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहेत .