E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ cm mukhyamanyri yojana doot ] : शासनाच्या विविध योजनांची प्रचार व प्रसिद्धीकरिता मुख्यमंत्री योजना दुत राज्यात राबवली जात असून , सदर योजनांच्या माध्यमातून राज्यातील तब्बल पन्नास हजार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत . सदर योजना दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे .
सदर योजना दुताची कामे राज्यातील नागरिकांना शासकीय योजनांच्या माहिती देणे , योजना कार्यक्रम राबवणे नागरिकांना योजनांच्या अर्जाकरिता मदत करणे, विविध योजनांच्या कार्यक्रमांमध्ये पुढाकार घेऊन नागरिकांना योजना विषयक माहिती देणे अशा विविध कामाकरिता सदर योजना दुधाची निवड करण्यात येणार आहे .
योजना दुतांच्या निवडीसाठी आवश्यक पात्रता : योजना दुतासाठी उमेदवाराचे वय 18-35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . त्याचबरोबर उमेदवार हा कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर त्याचबरोबर संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे. त्याच्याकडे अद्यावत मोबाईल असणे आवश्यक असेल , त्याचबरोबर सदर उमेदवार हा राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असेल त्याच्याकडे आधार कार्ड व बँकेचे खाते संलग्न केलेले असावेत .
योजना दुधासाठी आवश्यक कागदपत्रे : योजना दुत निवडीकरिता उमेदवाराकडे आधार कार्ड , पदवी उत्तीर्ण कागदपत्रे , रहिवासी प्रमाणपत्र बँक खात्याचा तपशील पासपोर्ट फोटो , हमीपत्र इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक असेल .
सदर योजना दुतास प्रतिमहा दहा हजार रुपये एवढे ठोक मानधन देण्यात येईल , याकरिता सहा महिन्यांचा करार केला जाणारा असून कोणत्याही परिस्थितीत सदर करार वाढवता येणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत . सदर योजना दुत प्रत्येक ग्रामपंचायत साठी 01 व शहरी भागामध्ये 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दुत या प्रमाणात राज्यात तब्बल 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येणार आहे .
याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता लवकरच संकेतस्थळ उपलब्ध करून दिले जाणार आहेत , त्यानुसार पात्र अर्जांची छाननी करून संपूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने आवेदन प्रक्रिया राबवली जाणार आहे .
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..