पुढील दोन दिवस राज्यात महाभयंकर अतिवृष्टी ; या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी !

Spread the love

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra rain Update upto 04 sept. 2024 ] : सध्या कालपासून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये महाभयंकर अतिवृष्टी होत आहे , यामुळे हवामान खात्याकडून काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे . सदरचा पाऊस पुढील दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे .

हवामान खात्याकडून दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस म्हणजे 4 सप्टेंबर पर्यंत राज्यात अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . यासंदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख श्री.के.एस. होसाळीकर यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे . यामध्ये प्रामुख्याने राज्यात मराठवाडा व विदर्भ विभागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे .

राज्यात कोकण व मध्य महाराष्ट्र मध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे . आज पावसाची शक्यता कालप्रमाणे राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . तर दिनांक 4 सप्टेंबर नंतर सदर पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

राज्यातील लातूर जिल्ह्यामध्ये कालपासून अति मुसळधार पाऊस पडत आहे . तर आज देखील सदर पाऊस कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे . लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसून येत आहे . याशिवाय नांदेड जिल्ह्यामध्ये देखील कालपासून अतिवृष्टी होताना दिसून येत आहे . यामुळे लातूर , नांदेड या जिल्ह्याना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

हे पण वाचा : ठाणे पालिका प्रशासन मध्ये अधिकारी , परिचारिका , बहुउद्देशिय कर्मचारी पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

सद्यस्थितीमध्ये नांदेड जिल्ह्यातील मुदखेड भोकर हदगाव हिमायतनगर किनवट या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अति मुसळधार पाऊस पडत आहे ,  यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालेली आहे .

या या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी :  वाशिम , बीड , परभणी , हिंगोली , यवतमाळ , जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसाने रौद्र धारण केले आहे . सदरच्या पाऊस पुढील दोन दिवस म्हणजे 04 तारखेपर्यंत राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे . यामुळे सदर जिल्ह्यांना दिनांक 4 सप्टेंबर 2024 पर्यंत पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर  अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.

Leave a Comment