E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state various scheme see detail ] : जनतेच्या कल्याणाकरिता महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारकडून विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केली जात आहे . यामध्ये सद्यस्थितीत सुरू असणारी लाडकी बहीण योजना , शेतकऱ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्याचबरोबर विद्यार्थ्यांना समपातळीवर कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत .
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की , सद्यस्थितीत लाडकी बहीण योजने अंतर्गत एक कोटी पेक्षा अधिक महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन हप्ते जमा करण्यात आली आहे . त्याचबरोबर अन्नपूर्णा योजना अंतर्गत प्रतिवर्षी तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येत आहेत . याशिवाय मुलींना उच्च शिक्षण घेता यावेत याकरिता मोफत उच्च शिक्षण योजना सुरुवात करण्यात आली आहे .
त्याचबरोबर महिलांना प्रवास सवलत देता यावी याकरिता महिलांना राज्यात मोफत बस सुविधा देण्यात आलेली आहे . ज्यातून महिलांचे आत्मसन्मान वाढण्यास सहकार्य होत आहेत . त्याचबरोबर राज्यात विकासाची कामे करण्याकरिता समृद्धी हायवे, कोस्टल रोड मेट्रो प्रकल्प यांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्याचबरोबर राज्यामध्ये रस्त्यांची कामे अधिक वेगाने होत आहेत . त्याचबरोबर राज्यांमध्ये देशातील सर्वात मोठा बोगदा मुंबई येथे होत आहे .
लाडकी बहिणी बरोबरच लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रता नुसार सहा हजार , आठ हजार व दहा हजार याप्रमाणे स्टायपेंड देऊन स्कील रोजगार निर्माण निर्माण केला जात आहे . याशिवाय मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षण देऊन ओबीसी सारख्या प्रवर्गातील सवलती देण्यात येणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आली आहेत .
त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्याकरिता शेतकऱ्यांना विविध योजना सवलती यामध्ये एक रुपयात पीक विमा तसेच शेतीसाठी मोफत वीज तसेच सोलार ऊर्जा उपलब्ध करून देण्याच्या विविध योजना सध्या राज्य शासनाकडून राबवणे जात आहेत . त्याचबरोबर नक्षली भागांमध्ये नक्षलवाद्यांचे प्रमाण कमी करण्याकरिता , विविध उपाय योजना राज्य शासनाकडून राबवली जात आहेत .
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..