दहावी व बारावी मध्ये 60% पेक्षा अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना 51 हजार रुपयांची आर्थिक मदत !

Spread the love

E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ ssc & hsc pass students scholarship ] : उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 51 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची तरतूद स्वाधारी योजना अंतर्गत करण्यात आलेली आहे . सदर योजना अंतर्गत राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना 51 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे .

राज्यामध्ये स्वाधार योजना पूर्वीपासून कार्यरत आहे  , या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब , होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत पुरवली जाते . या अंतर्गत सदर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खर्च करिता आर्थिक मदत राज्य शासनाकडून दिली जाते . ज्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास आर्थिक मदत होते , सदर योजना राज्यातील शेतकरी,  गरीब तसेच सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावेत,  याकरिताच सदर स्वाधार योजना सुरू केली आहे .

सदर योजनेअंतर्गत फक्त गुणवंत विद्यार्थ्यांनाच आर्थिक मदत दिली जाते . याकरिता सदर विद्यार्थ्यांचे पालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक असेल , त्याचबरोबर सदर विद्यार्थी हे दहावी अथवा बारावीनंतर दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी करिता असणाऱ्या कोणत्याही कोर्स ,पदवी ,पदविका करिता प्रवेश घेणे आवश्यक असणार आहे .

हे पण वाचा : लाईफकेअर लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 1121+ जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

ज्यामध्ये विद्यार्थ्यांना 60 टक्के पेक्षा अधिक गुण असणे आवश्यक असणार आहेत .  त्याचबरोबर सदर विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक असणार आहेत . यामध्ये सदर विद्यार्थ्यांना निवासाकरिता 28 हजार रुपये,  तर इतर सोयी सुविधा करिता 15 हजार रुपये , त्याचबरोबर इतर अत्यावश्यक शैक्षणिक साहित्य करिता अतिरिक्त पाच हजार रुपये असे एकूण 51 हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते . सदर मदत विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यांमध्ये डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यात येते.

अर्ज कसा करावा : सदर स्वादर योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्याकरिता ऑफलाइन पद्धतीने राज्याच्या समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात सविस्तर अर्ज भरून जमा करावेत.

Leave a Comment