राज्यातील “या” जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात अति मुसळधार पावसासह चक्रीवादळाची दाट शक्यता !

Spread the love

E- marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ maharashtra state rain and chakrivadal update ] : राज्यामध्ये मागील तीन दिवसापासून पावसाने दमदार सुरुवात केली असून , पुढील 24 तासात राज्यातील काही ठिकाणी अति मुसळधार पावसासह चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे . यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे , कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाची तसेच अति मुसळधार पावसाची शक्यता आहे ते पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .

आज पासून पुढची 24 तासांमध्ये राज्यातील गडचिरोली ,चंद्रपूर, वर्धा ,नागपूर  अमरावती या जिल्ह्यांत जोरदार पाउस होणार असल्याने , पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे.  तर राज्यातील लातूर ,परभणी , नांदेड, छत्रपती संभाजी नगर या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार राज्यातील पश्चिम महाराष्ट्र कोकण व विदर्भ करिता येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे . यावेळी मुसळधार पावसासह चक्रीवादळाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

देशामध्ये मान्सून परतीच्या वाटेवर असून , चक्रीवादळ निर्माण होण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे , कारण गुजरात वरील कमी दाबाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून , त्यामुळे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . गुजरात मध्ये अति मुसळधार पावसासह चक्रीवादळामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी घालवण्याचे कामकाज प्रशासनाकडून सुरू आहे . तर केरळमध्ये देखील परिस्थिती बिघडत चालली आहे , त्या तुलनेत  राज्यात कमी पाऊस व चक्रीवादळाची तीव्रता कमी असणार असल्याचे  अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

हे पण वाचा : आता रेशनकार्ड धारकांना तांदुळ ऐवजी मिळणार हे 9 जिवनावश्यक वस्तु ; जाणुन घ्या सविस्तर ..

म्हणजेच राज्यात चक्रीवादळ गुजरात लगतच्या नंदुरबार,  नाशिक,  मुंबई, पालघर, ठाणे,  जळगाव या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . सदर चक्रीवादळाची तीव्रता गुजरात राज्यापेक्षा कमी असणार आहे .

शेतकऱ्यांनो नियमित हवामान अंदाज कृषी विषयक माहिती योजना यांची रेग्युलर  अपडेट साठी खालील व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा !.

Leave a Comment