पंजाबराव डक अंदाज : ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात असा असणार पाऊसमान !

Spread the love

E- marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ punjabrao dakh new havaman andaj ] : मागील दोन दिवसापासून राज्यात पावसाची मोठी सुरुवात झाली आहे , हवामान तज्ञ पंजाब डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हवामान कसे असणार याबाबत सविस्तर अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .

पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार राज्यांमध्ये दिनांक 25 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट दरम्यान पावसाची दमदार सुरुवात होणार आहे . तर आजपासून पुढील तीन दिवस राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे . या काळात राज्यातील ओढे , नाले पावसामुळे वाहणार असल्याचे सांगण्यात आले आहे . त्याचबरोबर धरणामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज पासून 27 ऑगस्ट पर्यंत या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस : आज पासून दिनांक 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातील वर्धा, नागपूर ,चंद्रपूर, गोंदिया ,भंडारा ,वाशिम, यवतमाळ ,अकोला ,अमरावती ,हिंगोली ,बुलढाणा, परभणी ,नांदेड बीड ,लातूर , धाराशिव ,सांगली ,सातारा, पुणे ,नाशिक, अहमदनगर ,धुळे ,नंदुरबार, छत्रपती संभाजी नगर ,जळगाव, जालना या जिल्ह्यामध्ये मोठ्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे .

हे पण वाचा : या आठवड्यातील सहकारी संस्था, अनुदानित शाळा तसेच खाजगी क्षेत्रातील विविध पदांच्या 1750 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..

तर दिनांक 27 ऑगस्ट नंतर राज्यामध्ये कोरडे हवामान दिनांक 30 ऑगस्ट पर्यंत राहणार असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  या काळामध्ये राज्यात सर्व दूर सूर्यदर्शन होण्याचा अंदाज आहे,  म्हणजेच सदर तीन दिवसांमध्ये पाऊस राज्यात विश्रांती घेणार असल्याचा अंदाज आहे . तर पुन्हा 30 ऑगस्ट नंतर राज्यात हवामानामध्ये बदल होणार असून , दि.31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .

31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर : दिनांक 31 ऑगस्ट ते दिनांक 4 सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात पावसाचा जोर अधिकच वाढणार असल्याचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे .

Leave a Comment