E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ ladaki bahin yojna takrar] : राज्य शासनाकडून सुरू असलेली लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील काही महिलांना अर्ज भरताना अनेक प्रकारच्या अडचण येत आहेत , तर काही अर्ज वारंवार रिजेक्ट होत असल्याने , अशा महिलांना सदर योजना अंतर्गत अद्याप पर्यंत पैसे मिळाले नाहीत . याकरिता कशाप्रकारे तक्रार करावी , मदत कशी मिळवावी या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात ..
सदर योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये रक्कम खात्यामध्ये वर्ग करण्यात आली आहे . तर ज्यांचे अर्ज अद्याप पर्यंत पात्र ठरले नाहीत , अशांना पुन्हा अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे .
दिनांक 31 जुलै नंतर अर्ज करणाऱ्या पात्र महिलांना एकाच वेळी जुलै , ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्याचा एकत्रित 4,500/- रुपये इतकी रक्कम खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे . सदरची रक्कम माहे सप्टेंबर महिन्यामध्ये अदा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे . यामुळे ज्यांनी अद्याप पर्यंत अर्ज सादर केले नाही , किंवा अर्जांची त्रुटी पूर्तता केली नाही , अशांनी तात्काळ अर्जाची त्रुटी पूर्ण करून पुनश्च अर्ज सादर करण्याचे निर्देश देण्यात आली आहेत .
हे पण वाचा : 12 वि पात्रता धारकांसाठी 1000+ जागेसाठी महाभरती..
तक्रार कशी कराल : सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्याकरिता नारी शक्तीदुत या ॲप्सवर तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, याशिवाय ग्राम पातळीवर अंगणवाडी सेविका , मदतनीस आशा वर्कर , ग्रामसेवक यांच्याकडे आपल्या अडचणी मांडू शकता ..
महिलांच्या तक्रारीमध्ये अमान्य झालेले अर्ज दुरुस्त करण्याकरिता कशा पद्धतीने पुनश्च अर्ज कशा पद्धतीने करावे अशा तक्रारी आहेत . याकरिता आपल्या अंगणवाडी सेविका , मदतनीस यांची मदत घेण्याची सुचित करण्यात आले आहे , ज्यामुळे विहित कालावधीमध्ये आपले अर्ज सादर होऊन सदर योजना अंतर्गत लाभ मिळू शकेल .
सदर योजनेअंतर्गत आतापर्यंत तब्बल दोन कोटी पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाली आहेत , पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आली आहे . आतापर्यंत राज्यातील तब्बल 80 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात आले आहेत , उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे हस्तांतरित करण्यात येणार आहेत .