E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ lakhapati didi yojana ] : दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी राज्यात लखपती दीदी संमेलन त्याचबरोबर समुदाय संसाधन व्यक्तींचा सन्माान सोहळा आयोजित करण्यात आलेला असून , या दिवशी देशाचे पंतप्रधान मा.श्री.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपुर्ण देशभरातील स्वयंसहाय्यता गटांकरीता 2500/- कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे , तसेच 5000/- कोटी रुपयंचे बँक अर्थसहाय्य वितरणाचा मोठा कार्यक्रम संपन्न होणार आहे .
सदरचा कार्यक्रम हा राज्य शासनांच्या ग्रामीण जीवन्नोनती अभियान अंतर्गत संपन्न होणार आहे , सदर कार्यक्रम अंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर बनविणे , आर्थिक सक्षमीकरण करणे , महिलांना स्वत : ची ओळख निर्माण करुन देणे , तसेच त्यांना एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करुन देणे , अशा प्रमुख उद्दिष्टांसाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत .
यांमध्ये महिलांना ग्रामीण पातळीपासुन व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे उद्देश आहे , तसेच महिलांना बँकेचे व्यवहार , कृषीविषयक माहिती , करीता बँक सखी व कृषी सखी तसेच प्रशिक्षित समुदाय संसाधन व्यक्तींची नेमणुक करण्यात आलेली आहे .
सदर योजना अंतर्गत महिलांना व्यवसाय करण्यासाठी अत्यल्प व्याजदरांमध्ये कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते , सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये तब्बल 8,974 कोटी रुपयांचे कर्जाचे वितरण करण्यात आलेले आहेत . हे कर्ज आत्तापर्यंतचे सर्वात मोठे कर्ज आहेत . सदर योजना अंतर्गत आत्तापर्यंत 6,40,000 महिला स्वयं सहाय्यता समुह स्थापन झाले आहेत .
यांमध्ये आत्तापर्यंत 410 पेक्षा अधिक शेतकरी उत्पादक कंपन्या , 10,083 उत्पादक गट तर 31,812 ग्रामसंघ व 1,875 प्रभाग संघ तयार झालेले आहेत , सदर उमेद अभियाना अंतर्गत महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे , तसेच प्रत्येक जिल्ह्यांमध्ये प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातुन महिलांना प्रशिक्षण देण्यात येते , सदर योजनांचा लाभ घेवून आत्तापर्यंत राज्यातील 13 लाख पेक्षा अधिक महिला ह्या लखपती दीदी बनल्या आहेत .
या अभियान अंतर्गत महिलांकडून पापड , लोणचे , मसाले अशा प्रकारचे खाद्य पदार्थ तसेच कपडे , हस्तकला , मातीची भांडी , शिल्पकलेच्या वस्तु अशा प्रकारचे वस्तु तयार करीत आहेत , सदर उत्पादक वस्तुंना राज्य शासनांकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठा उपलब्ध करुन दिले जाते . सदर योजना अंतर्गत सध्याच्या घडीला ग्रामीण भागांमध्ये महिलांचे 38 लाखांपेक्षा अधिक उद्योग सुरु आहेत .
योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या अंगणवाडी सेविका / तलाठी / ग्रामसेवक / उमेद कार्यालयांसाठी भेट द्या ..
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..