आजपासुन दि.24 ऑगस्ट पर्यंत राज्यातील कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये पडणार जोराचा पाऊस ; जाणून सविस्तर हवामान अंदाज ..

Spread the love

E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra rain update upto date 24 August 2024 ] : राज्यात आजपासुन दिनांक 24 ऑगस्ट 2024 पर्यंत राज्यातील कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोराचा पाऊस पडेल याबाबत हवामान खात्यांकडून नविन अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

मागील आठवड्यांपासुन कोकण , पश्चिम महाराष्ट्रांमध्ये मोठा पाऊस पडत आहे . तर राज्यात पुढील 3-4 दिवस जोराचा पावसाची शक्यता हवामान खात्यांकडून वर्तविण्यात आलेली आहे . पुढील 3-4 दिवस राज्यात सर्वदुर पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने , संपुर्ण राज्यास पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

22 ऑगस्ट रोजीचा अंदाज : 22 ऑगस्ट रोजी राज्यातील मराठवाडा विभागातील नांदेड , परभणी , लातुर तर मध्य महाराष्ट्रातील सातारा , पुणे , नाशिक , नगर  तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग , रायगड , रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .सदर नमुद जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

हे पण वाचा : लिपिक पदांच्या तब्बल 200 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन ..

23 ऑगस्ट रोजीचा अंदाज : 23 ऑगस्ट रोजी विदर्भातील चंद्रपुर , गडचिरोली , अमरावती , वर्धा , गोंदीया , नागपुर तर कोकण विभागातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .

24 ऑगस्ट रोजीचा अंदाज : दिनांक 24 ऑगस्ट रोजी राज्यातील कोकण विभाग – रत्नागिरी , मध्य महाराष्ट्र सातारा तर विदर्भ विभागामधील सर्वच 11 जिल्ह्यांमध्ये 24 ऑगस्ट रोजी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे .




Leave a Comment