जुनी पेन्शन कि सुधारित राष्ट्रीय पेन्शन वरुन दि.29 ऑगस्टच्या बेमुद संपात ,सहभाग घेण्यावरुन कर्मचाऱ्यांमध्ये वाद !

Spread the love

E-marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee stike update news ] : राज्यातील कर्मचाऱ्यांचे दिनांक 29 ऑगस्ट 2024 पासुन पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संप आयोजित करण्यात आले आहेत , परंतु या संपामध्ये सहभागी व्हावे कि नाही याबाबत संभ्रमता निर्माण झालेली आहे . कारण समन्वय समितीच्या प्रसिद्धीपत्रकांमध्ये जुनी पेन्शन योजनांच्या मागणी ऐवजी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनांची मागणी करण्यात आली आहे .

राज्यातील कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करण्यात यावी , परंतु राज्य शासनांने मान्यता देण्यात आलेली मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखालील ( विश्वास काटकर – नेतृत्वाखालील ) सरकारी – निमसरकारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती , महाराष्ट्र यांच्या प्रसिद्धीपत्रकांमध्ये जुनी पेन्शन ची मागणी करण्यात आलेली नाही .

तर यांमध्ये प्रलंबित मागणीत सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना दिनांक 01 मार्च 2024 च्या प्रभावाने , अधिसूचनेच्या माध्यमातुन प्रस्तृत करण्यात यावी , ततसंबधातील तपशिलवार आदेश ( जी . आर ) सरकारी कर्मचारी , जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षण विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांना लागु करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आलेली आहे .यामुळे राज्यातील अनेक कर्मचारी नाराज आहेत .

राज्यातील एनपीएस धारकांची प्रमुख मागणी म्हणजे 1982 ची जुनी पेन्शन लागु करण्यात यावीत , यामुळे राज्यातील अनेक कर्मचाऱ्यांकडून नाराजगी दिसून येत आहेत . यामुळे सदर संपामध्ये किती कर्मचारी सहभागी होतील यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहेत , तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने संप आयोजित करण्याची चर्चा सुरु आहे .

समन्वय समितीच्या इतर प्रलंबित मागण्या : 1) दिनांक 01 नोव्हेंबर 2005 पुर्वी जाहीरात / अधिसुचना केलेल्या पदांवरील नियुक्त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तीवेतन ) नियम 1982 अंतर्गत समाविष्ट करण्याबाबत , जिल्हा परिषद व शिक्षण विभागातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे संदर्भातील अद्याप न काढलेले आदेश प्रसृत करण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .

तसेच मृत्यु उपदानाची रक्कम केंद्र सरकार प्रमाणे 25 लाख रुपये करण्यात यावी . तसेच 10 वर्षापेक्षा जास्त सेवा पुर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करणे , सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे , इ. प्रमुख मागणी करीता संप आयोजित करण्यात आला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment