E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Old Pension Scheme employee Strike news ] : जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत , यामुळे राज्य शासनांच्या सर्व प्रशासकीय यंत्रणा विस्कळीत होणार आहे .
मागील वर्षी नागपुर येथे अधिवेशन दरम्यान राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला होता , त्यावेळी राज्याचे मा.मुख्यमंत्री यांनी राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन प्रमाणे सामाजिक व आर्थिक लाभ देणारी पेन्शन योजना लागु करण्याचे आश्वासन दिले होते , व त्या अनुषंगाने अर्थसंल्पिय अधिवेशनांमध्ये जुनी पेन्शन प्रमाणे लाभ देणारी सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करण्याची घोषणा करण्यात आली होती .
परंतु सदर सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्य शासनांकडून अद्याप कोणताही अधिकृत्त निर्णय / अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली नाही . यामुळे राज्यातील तब्बल 17 लाख सरकारी कर्मचारी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाणार आहेत .
यांमध्ये राज्यातील सर्व शासकीय , निमशासकीय ( जिल्हा परिषद ) शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे , सदर कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी ही जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी . याबात कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती समन्वय समितीच्या वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदने देण्यात येत आहेत .
राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचारी एकदाच बेमुदत संपावर जाणार असल्याने , राज्य शासनांच्या सर्व प्रशासकीय यंत्रणा विस्कळीत होणार आहेत . याचा मोठा परिणाम राज्यात सर्वाधिक सुरु असणारी लाडकी बहीण योजनांच्या कामांस अडथळा निर्माण होणार आहे .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.