7 व्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने अदा करणेबाबत महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित दि.16.08.2024

Spread the love

E-marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ 7 th pay commission thakabaki installment paripatrak ] : NPS , DCPS खाते नाही अश्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने अदा करणेबाबत राज्‍य शासनांच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडून दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे .

माजी विधानसभा परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे यांचे दिनांक 19.02.2024 रोजीच्या पत्रानुसार एनपीएस , डीसीपीएस खाते नाही अश्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते रोखीने देणेबाबत , विनंती करण्यात आली आहे .

सन 2005 पुर्वी विना अनुदान / अंशत : अनुदान तत्वावर कार्यरत असणाऱ्या परंतु सन 2005 नंतर 100 टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना ( डीसीपीएस ) / राष्ट्रीय निवृत्ती योजना ( एनपीएस ) लागु असून यापैकी काही शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे ( एनपीएस ) ..

खाते उघडले नसल्याचे निदर्शनास आले आहेत , सदर कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय निवृत्ती योजना खाते / परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना खाते नसल्याने शासन निर्णय दिनांक 10.01.2020 मधील तरतुदीनुसार 7 व्या वेतन आयोगाचे हप्ते अदा करता येत नाही .

तथापि ज्या शिक्षक – कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन ( एनपीएस ) आयोगाचे खाते उघडले नाहीत , व ते सेवानिवृत्त झालेले आहेत , फक्त अशा शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आयोगाचे हप्ते रोखीने देण्यात यावेत असे नमुद करण्यात आले आहेत .

सदर परिपत्रक कक्ष अधिकारी शालेय शिक्षण विभाग मार्फत शिक्षण संचालक ( माध्यमिक / प्राथमिक ) महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या प्रति सादर करण्यात आलेला आहे .

आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.

Leave a Comment