E-marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ 16 sep. Leave various dm letters] : उद्या दिनांक 16 सप्टेंबर रोजी मुस्लिम बांधवांच्या ईद-ए-मिलाद या सणानिमित्त शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे . परंतु या सुट्टी संदर्भात मुस्लिम बांधवांनी 16 सप्टेंबर ऐवजी 18 सप्टेंबर रोजी सुट्टी देण्यात यावी अशी मागणी मुंबई शहर , मुंबई उपनगर जिल्ह्यातील नागरिकांनी केली असल्याने, या संदर्भात शासनाकडून निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याकरिता दिनांक 16 सप्टेंबर रोजी रद्द करून दिनांक 18 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे .
तसेच राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये मुस्लिम बांधवांचा मागणीचा विचार करून दिनांक 16 सप्टेंबर रोजी च्या सुट्टी बाबत निर्णय घेण्यात यावा असे निर्देश सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेली आहे . या संदर्भात संबंधित जिल्हाधिकारी यांनी याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आलेली आहे , तर राज्यातील काही जिल्ह्यांनी सदर सुट्टी बाबत परिपत्रक जाहीर केलेली आहेत..
तर ज्या जिल्हाधिकारी यांच्याकडून सदर सुट्टी बाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले नाही त्यांना सदर 16 सप्टेंबर रोजीची शासकीय सुट्टी कायम असणार आहे ..
- राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या बाबतीत दि.16.09.2024 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित !
- राज्यात या 11 दिवशी पडणार मुसळधार पाऊस ; ” या” जिल्ह्यांना अलर्ट जारी – पंजाबराव यांचा नवा हवामान अंदाज ..
- दि.01.01.2016 रोजी किंवा त्यानंतर सेवानिवृत्त / शासन सेवेत असताना निधन झालेल्या / होणाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण सुधारित करणेबाबत महत्वपुर्ण GR .
- पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार बातमीबाबत , राज्य शासनांकडून खुलासा !
- राज्यातील सर्वच शाळा दि.25 सप्टेंबर रोजी राहणार बंद ; सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर कर्मचाऱ्यांचा महामोर्चा ..